क) कौशल्य विकास व त्याद्वारे स्वावलंबन

१ ज्येष्ठ नागरिकांकडे कौशल्याचा अभ्यास करून त्यांचे कौशल्य वृद्धीच्या दृष्टीने विविध कौशल्य प्रशिक्षण देणे.
२ ज्येष्ठ नागरिकांना वस्तू अथवा पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्यास त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी व उत्पादित मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.
३ ज्येष्ठ नागरिकांकडून होऊ शकतील असे उद्योग उदा. नर्सरी, वाती तयार करणे, उदबत्ती तयार करणे, कलाकुसरीची कामे करणे, विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करणे, बांबूपासून वस्तू तयार करून घेणे, भाजीपाला निवडून त्याला वेस्टन लावून घेणे इ. साठी जागा व कच्चामाल उपलब्ध करून देणे तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
४ ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरामध्ये तीर्थयात्रा व पर्यटन स्थळ भेटीच्या सहली आयोजित करणे.
५ ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून देणे.
६. " आजीबाईचा बटवा" या उक्तीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांकडे असलेले परंपरागत औषधी वनस्पतींचे ज्ञान व त्यांचा उपचारांमध्ये होणारा उपयोग याची माहिती संकलित करणे संकलित माहितीची शक्य असल्यास हस्तपुस्तिका अथवा पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध करणे.
७ ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळवण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून आपात्कालीन सतर्क करणारी यंत्रणा ( Emergency Alert System) विकसित करणे उदा. मोबाईल अलार्म, इंटरनेट, जीपीएस याद्वारे सुरक्षेसाठी संपर्क केल्यास संकट समयी जेष्ठ नागरिकांना आहे त्या ठिकाणी मदत घेणे शक्य होईल.
८ विविध ठिकाणी असणारे वृद्धाश्रम बंद अवस्थेत असल्यास त्यांचे आवश्यक ती दुरुस्ती करून सर्व सुविधा पुरवून ते पुन्हा सुरू करणे तसेच कार्यक्षेत्रातील सर्व वृद्धाश्रमांना भेट देऊन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, भोजन, आरोग्यविषयक सोयी इत्यादीची पाहणी करणे व तेथील ज्येष्ठ नागरिकांना काही समस्या असल्यास त्या जाणून घेणे व त्यांचे निराकरण करणे. उपरोक्त प्रमाणे विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि.३१ ऑक्टोबर २०१९ नुसार जिल्हास्तरावर संबंधित जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या "जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समिती" ने सदर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी.