थोडसं माय-बापासाठी पण

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दिनांक ०९ जुलै ,२०१८ अन्वये ,”राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३” ची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून विभागनिहाय सविस्तर निर्देश निर्गमित केलेले आहेत.
शासनाच्या विविध विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालयांमार्फत ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुसह्य, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त व्हावा यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सेवा पुरविल्या जातात. परंतु, अशा सेवा त्या-त्या विभागामार्फत राबवितांना योजनांची माहिती नसल्याने किंवा त्यासाठी आवश्यक अर्ज, कागदपत्रे इत्यादीची पूर्तता करण्याची, सदर कार्यालयापर्यंत जाण्याची शारीरिक क्षमता नसल्याने शासनाकडून त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा पासून ज्येष्ठ नागरिक वंचित राहतात.
ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर, आनंददायी, आरोग्यवर्धक व तणावमुक्त होण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना व लोकसहभाग यांचा समन्वय साधून एक उपक्रम राबवण्याची बाब विचाराधीन होती. त्या अनुषंगाने औरंगाबाद विभागामध्ये “थोडेसे माय-बापासाठी पण” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

WhatsApp Image 2021 07 16 at 5.41.18 PM