सदरील उपक्रमात खालील नमूद बाबींचा समावेश असेल.

अ) वैयक्तिक बाबी :
१ ज्येष्ठ नागरिकांच्या नावे असलेल्या मालमत्तेची नोंद त्यांच्या नावावर नसल्यास नियमानुसार सदर नोंद घेऊन अद्ययावत ७/१२, ८-अ उतारे, अखीव पत्रिका इत्यादी जेष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देणे.
2 ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक खाते पुस्तक ज्येष्ठ नागरिक बस पास इत्यादी नसल्यास नियमानुसार उपलब्ध करून देणे
३ ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार व नियमानुसार शिधापत्रिका उपलब्ध करून देणे व अन्नधान्य मिळण्यास पात्र जेष्ठ नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्य उपलब्ध करून देणे
४ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खालील विविध योजना साठी नियमानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळवून देणे
२. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,
३. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,
४. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना,
५. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना.
५ ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळणं करणाऱ्या कुटुंबियांचे समुपदेशन करून सांभाळ करण्यास उद्युक्त करणे.
६ हालचाल करता येत नसलेल्या व त्यासाठी आवश्यक साधने नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हालचालीसाठी पूरक साधने जसे की आधारासाठी काठी, वॉकर, व्हील चेअर इत्यादी तसेच सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टिकोनातून टॉर्च, छत्री, रेनकोट, स्वेटर चपला, कापडी बुट, पावसाळी बूट व इतर साधने उपलब्ध करून देणे.